सोलापूर : आखाती देशांत सुरु असलेल्या युध्दांमुळे गॅस पुरवठा प्रभावित झाले असून, घरगुती गॅस पुरवठा सुरळित करण्यासाठी ग्रामीण भागात ज्याठिकाणी बुकींग केलेल्या ग्राहकांना गॅस उपलब्ध करुन दिल्यानंतर जे शिल्लक राहतील, तो साठा सोलापूर शहरात गर्दी असलेल्या गॅस वितरण केंद्रातून ग्राहकांना वितरित केले जाईल. व्यावसायिकांच्या 4 हजार गॅसची मागणी असून, 2600 गॅसची दररोज पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ई-केवायसीसाठी गॅस वितरण केंद्रावर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यासाठी आता गॅस ग्राहकांना घरी बसल्या मोबाईल ॲपमधून ई-केवायसी करता येणार आहे, ॲप आणि क्यूआर कोड स्कॅन हे ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार आहे. घरगुती गॅसची पुरवठा घरपोच केली जात आहे. लोकांनी पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
रिक्षाचालकांनी गोगॅस आणि एलपीजी गॅससाठी भेटले होते. गो गॅस पूर्णतः सध्या बंद आहे. 18 हजार रिक्षा असून, यात 8 हजार रिक्षा हे एलपीजीवर चालवत होते. दररोज या रिक्षांना 4 किलोलीटर गॅस लागत होती. आता गॅस सुरक्षित पुरवठा झाल्यानंतरच विषय मार्गी लागणार आहे, असे सांगितले.