Maharashtra Farmer Loan Waiver Pudhari
सोलापूर

Farmer Loan Waive: जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. कर्जाचा भार हलका होणार असल्याने शेतकऱ्यांंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या 28 हजार 916 शेतकऱ्यांचे कर्ज थकले आहे. त्यातील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखांपर्यंत आहे त्या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. याशिवाय पीक कर्जासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी स्टेट बँक, बँक ऑफ इंडियासह अन्य बँकातूनही पीककर्ज घेतले आहे. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे शेती उत्पादनात घट झाल्याने, नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकले आहे. अशा शेतकऱ्यांची माहिती इतर बँकेकडे असून, त्याची नेमकी माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही. परंतु अशा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा होणार असून, त्यांचे कर्ज माफ होणार आहे.

जिल्हा बँकेच्या 28 हजार 916 शेतकऱ्यांचे थकले कर्ज

जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील 28 हजार 916 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. त्यातील काही शेतकऱ्यांनी दोन लाखांवरती तर काही शेतकऱ्यांनी कर्ज दोन लाखांच्या आतमध्ये कर्ज घेतली आहेत. त्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार असून, सर्वाधिक शेतकरी हे करमाळा तालुक्यातील आहेत.

जिल्हा बँक थकीत कर्जाची तालुकानिहाय आकडेवारी

उत्तर सोलापूर - 777, दक्षिण सोलापूर - 2560, पंढरपूर - 2454, सांगोला - 1170, माळशिरस - 2104, बार्शी - 2155, करमाळा - 5692, मोहोळ - 1879, माढा - 4179, अक्कलकोट - 2821, मंगळवेढा - 3125 असे एकूण 28916 शेतकऱ्यांची कर्ज थकले असून, यातील पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे.

शासनाच्या कर्जमाफी संदर्भात अजून आम्हाला आदेश प्राप्त झालेला नाही. राष्ट्रीय बँकांच्या थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही.
- राम आकुर्डे, व्यवस्थापक, अग्रणी बँक, सोलापूर
शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय स्वागताचा निश्चितच आहे. मात्र त्यात अटी शर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. सर्वच बँकातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे.
- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT