सोलापूर ः गाडीला चावी तशीच ठेवून भजी खाण्याचा मोह एका व्यक्तीस महागात पडला. गाडीच्या डिकीत ठेवलेली अडीच लाख रुपयांची रक्कम चोरट्याने हातोहात लांबवली.
शशिकांत सिद्रामप्पा बिराजदार (वय 71, मसरे गल्ली, उत्तर कसबा) हे 22 ऑॅगस्ट रोजी श्रीपाद ज्वेलर्स समोरील पवनकुमार भेळ हारूस येथे भजी घेण्यासाठी थांबले. त्यांच्या अॅक्टिवा गाडीला चावी तशीच ठेवली. दरम्यान, चोरट्याने संधी साधत गाडीच्या डिकीत ठेवलेली अडीच लाख रुपयांची बॅग हातोहात लांबविली. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.