कर्णबधिर जागरुकता दिन विशेष  Pudhari Photo
सोलापूर

सोलापूर : जीवनमान उंचावण्यासाठी जनजागृती व्हावी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा

कर्णबधीर व्यक्तीचे जीवनमान उंचवण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी. कर्णबधिर व्यक्तींकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदलावा. कर्णबधिर व्यक्तींच्या हक्कांचे जतन व्हावे, समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने कर्णबधिरता जागरुकता दिन म्हणून 24 सप्टेंबरला साजरा केला जातो. कर्णबधिर व्यक्तींसंदर्भात वेगवेगळ्या संज्ञा वापरण्यात येतात. त्यामध्ये कर्णबधिर, मूकबधिर, सांकेतिक भाषा, जागतिक सांकेतिक भाषा दिन अशा विविध संज्ञा कर्णबधिर व्यक्तींच्या संबंधित वापरण्यात येतात. एखाद्या व्यक्तीला ऐकायला न येणे किंवा बोलता न येणे, ऐकणे आणि बोलणे या संबंधित असणार्‍या समस्या साधारणपणे कर्णबधीर या दिव्यांग प्रकारांमध्ये त्याचे निदान होते. आणि त्यानुसार त्या व्यक्तीला उपचार करतात. कर्णबधिर प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.

कर्णबधिर जागरुकता दिनाची वैशिष्ट्ये

  • जगभरातील कर्णबधिर लोकांच्या समस्यांविषयी सामान्य लोकांना माहिती करून देणे.

  • कर्णबधिर लोकांना आवश्यक म्हणून सांकेतिक भाषा शिकण्यास प्रोत्साहन देणे.

  • कर्णबधिर लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे.

संभाव्य धोका कोणास होऊ शकतो?

50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे वयस्क किंवा गोंगाटाच्या ठिकाणी काम करणारे अशा लोकांना कानाच्या समस्या होण्याचा धोका जास्त असतो. बहिरेपणाचे लवकर निदान होण्यासाठी आवश्यक सेवा आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

बहीरेपणाची कारणे

  • कानात संसर्ग.

  • वृद्धत्व, आनुवांशिकता

  • कानाचे रोग

  • दीर्घकाळ

  • मोठ्या आवाजात राहणे

  • इअरफोन, डीजेच्या आवाजामुळे कर्णबधिरपणा

कानाची अशी घ्यावी काळजी

कानात धारदार वस्तू घालणे टाळावे. गोंगाटाच्या ठिकाणी जाणे टाळावे. ध्वनी प्रदूषण टाळावे. टीव्ही, स्टेरिओ कमी आवाजात ऐकावे. डॉक्टरांनी सांगितल्याखेरीज कानात तेल किंवा कोणत्याही प्रकारचे द्रव टाकू नये.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT