सोलापूर

Dr Smita Jadhav : श्रीराम शिक्षण संस्थेचे कार्य ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी : डॉ. स्मिता जाधव

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या श्रीराम शिक्षण संस्थेचे कार्य अत्यंत दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी काढले. आज त्यांनी संस्थेला सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली.

या भेटीदरम्यान पाटील कुटुंबीयांच्या वतीने डॉ. स्मिता जाधव यांचे आदरतिथ्य व आपुलकीने स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या बैठकीत श्रीराम शिक्षण संस्थेची आजवरची यशस्वी वाटचाल, ग्रामीण भागातील शिक्षणापुढील नवी आव्हाने तसेच उच्चशिक्षित व पदवीधर तरुणांच्या भविष्यातील अपेक्षा यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर आणि मनमोकळी चर्चा झाली.

याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रकाशबापू शामराव पाटील, श्रीलेखाताई पाटील, करण पाटील, ॲड. अभिषेक पाटील यांच्यासह माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि रावेरचे आमदार अमोल जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी संस्था करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे उपस्थितांनी यावेळी विशेष कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT