सोलापूर

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी अडवला : जोरदार घोषणाबाजी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

backup backup

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंद असून यादरम्यान आता आंदोलकांनी गेवराई शहरानजीक सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग आडवला आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या असून जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आदी घोषणा देत ग्रामीण भागातील आंदोलन करते गेवराई शहरात दाखल झाले होते. आंदोलकांची संख्या लक्षात घेता पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला होता.

अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज चा निषेध म्हणून गेवराई तालुक्यातील धोंडराई गावात मराठा समाज बांधवांकडून सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी तीनही मंत्र्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

गेवराई बायपास वर हजारो मराठा एकवटले होते रस्ता वर बसून वाहन अडवले होते याचं दरम्यान माणूसकिचे दर्शन म्हणून रूग्ण वाहि केला आंदोलनकर्त्यांनी रस्ता देत गाडी बाहेर काढली

SCROLL FOR NEXT