सोलापूर

Teachers Protest: आम्‍हाला टीईटी; तुम्‍हाला गुवाहाटी

शिक्षकांचा सवाल; टीईटी, अशैक्षणिक कामांविरोधात आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : रद्द करा, रद्द करा, टीईटी परीक्षा रद्द करा अशा घोषणा देत टीईटी रद्दच्या प्रमुखसह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 9) शिक्षकांनी पूनम गेट येथे आंदोलन केले. यावेळी विविध शिक्षक संघटनेच्‍या अध्यक्षांनी आम्‍हाला टीईटी अन्‌ तुम्‍हाला गुवाहाटी, असा सवाल उपस्‍थित करत टीईटी परीक्षांसह बीएलओ, एसआयआर कामांना कडाडून विरोध केला.

सेवेमध्ये कार्यरत शिक्षकांना टीईटी सक्‍तीच्‍या निर्णयाचा पुनर्विचार करावा, यासह विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्‍हा सर्व शिक्षक संघटना समन्‍वयक समितीच्‍या वतीने चार पुतळा येथून जिल्‍हा परिषदेच्‍या गेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी विविध शिक्षक संघटनेच्‍या अध्यक्षांनी टीईटी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. याप्रसंगी राज्‍य प्राथमिक शिक्षक भारतीचे नवनाथ गेंड, मागसवर्गीय शिक्षक संघटना राज्‍याध्यक्ष शामराव जवंजाळ, राजन सावंत, निलेश देशमुख, सुरेश पवार, संभाजी फुले, सुजित काटमोरे, वीरभद्र यादवाड, संजीव चाफाकरंडे, रामराव शिंदे, बसवराज गुरुव, रवींद्र जेटगी, राजेंद्र मुलगे उपस्‍थित होते.

नवीन शैक्षणिक वर्षाच्‍या प्रारंभी शिक्षकांना बीएलओ म्‍हणून नियुक्‍त करण्यात आल्‍याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्‍यामुळे ही नियुक्‍ती रद्द करावी. पदोन्नती प्रक्रिया राबविताना सेवाज्‍येष्ठ शिक्षकांवर होणारा अन्‍याय दूर करावा. सरसकट जुनी पेन्‍शन लागू करावी. 15 मार्च 2024 ची संचमान्‍यता रद्द करावी, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT