TET Exam Pudhari
सोलापूर

TET Exam: टीईटी अर्जासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेच्या (महाटीईटी) अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेच्या (महाटीईटी) अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना 24 एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

दि. 25 मार्च रोजी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 21 जून रोजी परीक्षा निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी 27 मार्च ते 16 एप्रिल ही मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि उमेदवारांच्या वाढत्या मागणीचा विचार करून परिषदेने ही मुदत वाढवून दिली आहे. यामुळे सोलापूरसह राज्यभरातील हजारो इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परीक्षेचे नियोजन पाहता, पात्र उमेदवारांना 9 ते 21 जून या कालावधीत प्रवेशपत्रे उपलब्ध होतील. 21 जून रोजी सकाळी 10.30 ते 1 या वेळेत पेपर क्रमांक एक, तर दुपारी 2.30 ते 5 या वेळेत पेपर क्रमांक दोन घेतला जाईल. सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे 17,863 उमेदवारांनी अर्ज भरले असून, मुदतवाढीमुळे हा आकडा 20 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT