Terrace Gardening 
सोलापूर

Terrace Gardening : परसबागेपेक्षा आता टेरेस गार्डनला पसंती

रसायनमुक्त भाजीपाला आणि स्वतःच्या आवडीसाठी नागरिकांचा अवलंब

पुढारी वृत्तसेवा
रामेश्वर विभूते

सोलापूर : पूर्वी घरात एक परसबाग असावी, अशी इच्‍छा असायची. पण अलिकडे या सिमेंटच्या जंगलात टेरेस गार्डनची क्रेझ खूप वाढली आहे. वाढते नागरीकरण, अपार्टमेंट संस्कृती आणि सेंद्रिय भाज्या खाण्याकडे वाढलेला कल यामुळे नागरिक घराच्या छताचा किंवा बाल्कनीचा वापर सुंदर हिरवाई फुलवण्यासाठी करत आहेत.

बाजारातील रासायनिक भाज्यांपेक्षा स्वतःच्या डोळ्यांसमोर घरच्या घरी छतावर किंवा कुंडीत पिकवलेल्या सेंद्रिय भाज्या खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. झाडांची आवड असणारे लोक छताचा किंवा बाल्कनीच्या कोपऱ्यांचा वापर करून आपली बागकामाची हौस भागवत आहेत. दिवसभराच्या धावपळीतून आणि सिमेंटच्या जंगलातून सुटका मिळवण्यासाठी छतावर हिरवेगार वातावरण तयार केले जात आहे.

अनेक कुटुंब संध्याकाळी छतावरील बागेत एकत्र वेळ घालवणे पसंत करत आहेत. आता टेरेस गार्डन तयार करून देणारे आणि त्यांची देखभाल करणारे अनेक व्यावसायिक व हायटेक नर्सरी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे लोकांना स्वतः टेरेस गार्डन उभारणे सोपे झाले आहे. सध्याच्या काळात टेरेस गार्डन (गच्चीवरील बागकाम) करण्याची क्रेझ खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

ही आहेत कारणे...

l बाजारातील भाज्यांवर औषध फवारणी असते. त्यामुळे स्वतःच्या हाताने उगवलेली, सेंद्रिय आणि ताजी भाजी खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

l धावपळीतून आणि स्क्रीन टाईममधून ब्रेक घेण्यासाठी लोकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आवडते. यामुळे मानसिक ताण कमी होतो.

l टेरेसवरील रोपे सूर्यप्रकाशाला शोषून घेतात. यामुळे घराचे तापमान कमी होते आणि घर थंड राहते.

l सुंदर फुलांची झाडे, शोभेची झाडे आणि लायटिंग करून लोक आपल्या टेरेसचे एका सुंदर कॅफे किंवा सिटिंग एरियामध्ये रूपांतर करत आहेत.

५० वर्षांपासून मी पर्यावरणाचे काम करत आहे. अनेकांना बागा, परसबागा, गच्चीवरील बागा याकामी सोलापुरात असताना सहकार्य केले. सध्या अमेरिकेत असलो तरी इथेही पर्यावरणाचे काम करत आहे. हा माझा ध्यास आहे.
- नारायण पाटील, पर्यावरणप्रेमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT