Talathi recruitment  Pudhari File Photo
सोलापूर

Talathi recruitment: राज्यातील हजारो गावे रावसाहेबांच्या प्रतीक्षेत

तलाठी भरती रखडली : अतिवृष्टीसह इतर शासकीय कामांची गती मंदावली

पुढारी वृत्तसेवा
अमोल साळुंके

सोलापूर : राज्यात तलाठी भरती रखडली आहे. अतिवृष्टीसह इतर शासकीय कामांची गती मंदावली असून, राज्यातील हजारो गावे रावसाहेबांच्या प्रतीक्षेत आहेत.

महसूलच्या आकृतीबंधानुसार राज्यांमध्ये तलाठी मंडळ अधिकारी, महसूल सहायकांच्या अंदाजे 15 हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्यातीलच काहीच पदे भरण्याची महसूलमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र, ती पदे भरण्यात आली नाहीत, त्यामुळे तलाठी पदांची केव्हा भरती होणार, याकडे भावी परीक्षार्थी डोळे लावून बसले आहेत.

सध्या आकृतीबंधानुसार राज्यात 10 हजारपेक्षा जास्त तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. त्यातील काहीच जागा भरल्या जाणार आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षापासून तलाठी पदांची भरती प्रक्रिया रखडली असून, तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांची तब्बल एक हजार 700 पदे वित्त विभागाची मान्यता मिळताच भरली जाणार असून, त्या आदेशाकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

चार हजार पदे भरली

राज्यात 2023-24 साली तलाठी पदांसाठी मेगा भरती करण्यात आली. यावेळी चार हजार 793 पदांची जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील चार हजार 212 उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश दिले. त्यापैकी तीन हजार 850 उमेदवारांनी पदभारही स्वीकारला. तसेच त्या भरतीमधील 942 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या. त्या व्यतिरिक्तही 757 पदे आता रिक्त आहेत. अशी सर्व मिळून एक हजार 700 पदे भरण्याची मागणी होत आहे.

अतिवृष्टीचे पंचनामे करणे, विविध महामंडळाचे योजना तळागाळात पोचविणे, नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखल्यांसह अनेक गोष्टीसाठी तलाठीची गरज आहे. मात्र, बरेच गावांना तलाठी नसल्याने कामे तत्काळ होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे तलाठी भरती करावी.
- प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT