Sushilkumar Shinde Pudhari
सोलापूर

Sushilkumar Shinde : डिलिमिटेशनवर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘सर्वसंमतीने झाले असते तर बरे झाले असते’

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विरोधाची भूमिका घेतली असताना त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मात्र वेगळी भूमिका

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विरोधाची भूमिका घेतली असताना त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र याबाबत वेगळी भूमिका मांडली.

डिलिमिटेशन होणे गरजेचे आहे, मात्र त्याची पद्धत चुकीची आहे. याशिवाय त्यासाठीची योग्य वेळ निघून गेली आहे. बिलाविषयीची प्रक्रिया सर्वसंमतीने झाली असती तर अधिक चांगले झाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकसंख्या जशी वाढत आहे, तसे लोकप्रतिनिधींत्व मिळायला पाहिजे. त्यामुळे डिलिमिटेशन होणे जरूरीचे आहे. हे व्यक्तिगत मत असल्याचेही शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT