File Photo
सोलापूर

गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत चला चेन्नई, कन्याकुमारीला

मुंबई-चेन्नई, मुंबई-कन्याकुमारी समर विशेष एक्स्प्रेस धावणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मार्च महिना संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सोलापूरकर फिरायला जाण्याचा बेत आखतात. त्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेने मुंबई-चेन्नई-मुंबई आणि मुंबई-कन्याकुमारी-मुंबई समर स्पेशल एक्स्प्रेस सोलापूरमार्गे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोलापूरकरांना उन्हाळी सुट्टीत पुणे, मुंबई, चेन्नई अन् कन्याकुमारीला फिरायला जाता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01015 मुंबईहून बुधवार 09, 16, 23, 30 एप्रिल रोजी धावेल. गाडी क्रमांक 01016 चेन्नई सेंट्रलहून गुरुवार 10, 17, 24 एप्रिल आणि 01 मे अशा एकूण आठ फेर्‍या धावतील. मुुंबई-चेन्नई एक्स्प्रेस मुंबईहून बुधवारी रात्री 12.20 वाजता सुटेल. सोलापूर स्थानकावर सकाळी 7.30 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 7.35 वाजता चेन्नईकडे रवाना होईल. चेन्नईला ती रात्री 11.30 वाजता पोहोचेल. चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे चार वाजता चेन्नईहून निघेल. सोलापूरला रात्री 8.10 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन, 8.15 वाजता मुंबईकडे रवाना होईल, तर मुंबईला शुक्रवारी पहाटे 4.15 वाजता पोहोचेल. या गाडीला एक एसी टू टियर, पाच एसी थ्री टियर, दहा स्लीपर, चार जनरल आणि दोन एसएलआर असे एकूण 22 आयसीएफ कोच असतील.

गाड्यांचे वेळापत्रक

गाडी क्रमांक 01005 मुंबई-कन्याकुमारी ही 9 एप्रिल ते 25 जून दरम्यान 12 फेर्‍या धावेल. गाडी क्रमांक 01006 कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस 10 एप्रिल ते 26 जूनदरम्यान 12 फेर्‍या धावतील. गाडी क्रमांक 01005 मुंबईहून बुधवारी रात्री 12.30 वाजता निघेल. सोलापूरला सकाळी 8.30 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8.35 वाजता रवाना होईल. कन्याकुमारीला गुरुवारी दुपारी 1.45 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01006 कन्याकुमारीहून दुपारी 4.45 वाजता निघेल. सोलापूरला शुक्रवारी रात्री 8.10 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8.15 वाजता रवाना होईल. मुंबईला शनिवारी पहाटे 4.15 वाजता पोहोचेल. या गाडीस चार एसी टू टियर, सहा एसी थ्री टियर, चार स्लीपर, चार जनरल, एक एसएलआर आणि एक पॉवर कार असे एकूण 20 एलएचबी कोच असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT