APAAR ID Pudhari
सोलापूर

APAAR ID: विद्यार्थ्यांनो, अपार आयडी नसल्यास घाबरू नका

सीईटी सेलने काढला मध्यममार्ग

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सीईटीच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलासा दिला आहे.

आधार आणि एपीएएआर (अपार) प्रमाणीकरण पूर्ण करताना अनेक उमेदवारांना तांत्रिक अडथळे येत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, कोणताही पात्र विद्यार्थी अर्जापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने नियमांत शिथिलता आणली आहे. सीईटी सेलने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेदवारांना तांत्रिक किंवा इतर रास्त कारणांमुळे आधार आणि अपार प्रमाणीकरण पूर्ण करणे शक्य होत नाही, ते आता या प्रमाणीकरणाशिवाय देखील नोंदणी पोर्टलवर आपले अर्ज भरून सबमिट करू शकतात. जरी आधार प्रमाणीकरण हा पडताळणीचा पसंतीचा मार्ग असला, तरी तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

मात्र, ज्या उमेदवारांना आधार वापरून नोंदणी करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, त्यांनी मूळ प्रक्रियेचेच पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी पूर्ण करावी व शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT