सोलापूर

स्त्री शक्ती फाउंडेशनला गोल्डन गाईजच्या हस्ते सामाजिक पुरस्कार प्रदान

अमृता चौगुले

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूर शहरात फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सोलापूरातील सैपन इनामदारच्या फॅशन शोमध्ये सुप्रसिध्द गोल्डन गाईजच्या हस्ते स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका किरण माशाळकर यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सोलापूर शहरात मुलींना प्रोत्‍साहीत करण्यासाठी फेस ऑफ इंडिया, इंडियाज बिगेष्ट ब्युटी पेजेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध राज्‍यातील महिलांनी सहभाग घेतला होता. पारितोषक वितरण सोहळयाला प्रसिध्द गोल्‍डन गाईज उपस्‍थित होते. स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनला सामाजिक पुरस्‍कार देण्यात आला.

स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन ही संस्था महिला व बालकल्याण यावर कार्य करते. ही संस्‍था सोलापूरात गेल्या 5 वर्षाहून अधिक काळ कार्य करत आहे. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण असा या संस्थाचा मुख्य हेतु आहे.

तसेच ' महिला रोजगार, अनाथ आश्रममध्ये जेवण आणि खाऊ वाटप, गोर गरिबांना धान्य वाटप, महिलांना सणा-सुदीला साडी वाटप, महिला मेळावा असे अनेक उपक्रम घेतले जातात. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहले पाहीजे. सर्व क्षेत्रात पुढाकाराने काम केले पाहीजे. सध्या सर्व क्षेत्रात महिला काम करत असून त्‍यांनी येथून पुढेही न थांबले नाही पाहीजे. गरजू महिलांसाठी आम्‍ही सदैव तयार आहोत, असे किरण माशाळकर म्‍हणाले.

सोलापूर शहरात प्रथमच सर्वांत मोठा द बिगेष्ट ब्यूटी पेजेंट फेस ऑफ इंडिया सैपान इनामदार यांनी आयोजीत केला होता. दरम्‍यान, सोलापूरकरांनी या शो ला भरपूर प्रतिसाद दिली. शोमध्ये अनेक शहरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. मुंबई, दिल्‍ली, गुजरात, लखनव, पुणे, लातूर, पंजाब, इत्यादी शहरांचा समावेश होता. या मध्ये किड्स, मिस मिस्टर मिसेस कैटेगरी होते.

या शो मध्ये विजेते झालेल्या गायत्री शर्मा, नंदिनी पिनाबत्ती जयश्री तिरवाडी, राशी देसाई, नोमान खान, रूपेश जाधव, लवली कदम, भाग्यश्री उपाध्येय आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून गोल्डन गाइज सनी वाघचौरे, संजय गुजूर, पूजा शर्मा, हिजाबी क्वीन, यांची उपस्थिती होती.

-हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT