Theft case: हळदी-कुंकू कार्यक्रमातून चोरलेला सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त Pudhari
सोलापूर

Theft case: हळदी-कुंकू कार्यक्रमातून चोरलेला सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोपाळपूर येथील घटना, पंढरपूर तालुका पोलिसांनी केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे हळदी-कुंकूसाठी जात असताना आबासाहेब आसबे यांच्या पत्नीचे सुमारे 8 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. या चोरीचा तपास पंढरपूर तालुका पोलिसांनी करत मंगळवेढा येथील व्यापाऱ्यास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनेच्या दिवशी हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे विचारपूस केली. त्यातून सखोल तपास करून मंगळवेढा येथील व्यावसायिक अविनाश वाघमारे रा. मंगळवेढा याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. यानंतर अविनाश वाघमारे व गोपाळपूर येथील त्याचा मित्र यांनी चोरीस गेलेले 8 लाख 25 हजाराचे 55 ग्रॅमचे सोन्याचे दागिने काढून दिले. ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विभावरी रेळेकर, पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, विजू गायकवाड, पोलिस हवालदार सचिन आटपाडकर, पोलिस हवालदार साळुंखे, बाजीराव काकडे, सागर गवळी, मंगेश रोकडे, विजयकुमार आवटी, अभिमन्यू गरड, चालक पोलिस हवालदार हसन नदाफ, विलास घाडगे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT