बार्शी : तालुक्यातील तांदुळवाडी येथील चोरी प्रकरणातील गुन्ह्यात आरोपीकडून जप्त करण्यात आलेले 88 हजार रुपये किमतीचा ऐवज मूळ फिर्यादी कल्याण नागनाथ धुमाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सपोनी हेमंतकुमार काटकर, पोलीस हवालदार संगम वडले, मुद्देमाल लिपीक विनोद बांगर आदी उपस्थित होते.
फिर्यादी धुमाळ यांनी दागिने व इतर मौल्यवान वस्तु घरातील स्वयंपाक खोलीतील कापडी बॅगमध्ये ठेवले होते. दि.4 मार्च रोजी ते जेवण करुन घराच्या हॉलमध्ये झोपले होते. दरम्यान लघुशंका करण्याकरीता उठले असता, घरातील दोन वेगळ्या खोल्या उघड्या दिसल्या. कडी कोयंडा तुटलेलेला दिसला. आत जावुन पाहीले असता, त्या खोल्यामधील वस्तु अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी रोख रकमेसह 88 हजारांचा ऐवज लंपास केला होता.
पांगरी पोलिसांनी तपासादरम्यान लखन अशोक कूलकर्णी (रा-चांभार गल्ली मंगळवेढा) व अजीज दादापीर मनगूळी (रा. विजापूर गल्ली कासेगाव ता पंढरपूर) या दोघांना अटक केली होती.त्यांच्याकडून या चोरीमधील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.