पंढरपूर : निवेदन देताना दिगंबर सुडके, रशीद शेख, सुनील जाधव, संजय म्हमाने आदी pudhari photo
सोलापूर

भूवैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिनी सुरू करा

Gas crematorium: पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेला निवेदन

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर शहरातील भूवैकुंठ स्मशानभूमीतील बंद अवस्थेत असलेली गॅस दाहिनी सुरू करण्यात यावी. या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्यावतीने देण्यात आले.

पंढरपूर शहरातील भूवैकुंठ स्मशानभूमीमधील गॅस दाहिनी गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी लाकडाचा वापर करावा लागत आहे. यासाठी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

बंद अवस्थेत असलेली गॅस दाहिनी सुरू केल्यास सामान्य नागरिकांचा खर्च कमी होईल. पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही. समतोल राखला जाईल. यामुळे पंढरपूर शहरातील स्मशानभूमीतील गॅस दाहिनी सुरू करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पंढरपूर नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. यावेळी रशीद शेख, सुनील जाधव, संजय म्हमाने, संजय सातपुते, सचिन सोलंकी, राजू वडतीले उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT