Ladki Bahin Yojana 
सोलापूर

Ladki Bahin Yojana Solapur: तब्बल पाच हजार लाडक्या बहिणी लाभाविना

शहर-जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील या लाडक्या बहिणींचे अनुदान चालू राहण्यासाठी शासनाकडून केवायसी करण्याची सूचना दिल्‍या

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचा दाखला अर्जासोबत जोडवा लागत असल्याने तो मिळवण्यासाठी महिला व बालविकास कार्यालयाकडे ७५०० हजार महिलांचे अर्ज आले आहेत. यातील पाच हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचा दाखला पडताळणी करून देण्यात आले.

शहर-जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील या लाडक्या बहिणींचे अनुदान चालू राहण्यासाठी शासनाकडून केवायसी करण्याची सूचना दिल्‍या. केवायसीनंतर आयकर, एकत्रित कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या, कुटुंबातील वाढलेले उत्पन्न, चारचाकी वाहन आदी असल्याचे आढळून आल्याने अनेकांचे अनुदान आपोआपच बंद झाले.

अनुदान बंद झाल्याच्या चौकशीसाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात या लाडक्या बहिणींचे लोंढेच काही दिवस दाखल झाले. चौकशीत अनुदान बंद झाल्याचे कारण कळताच यांच्याकडून आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज देऊ लागलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याचा दाखला देण्यासाठी संबंधित महिलांनी या कार्यालयाकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची तपासणीनंतर संबंधित महिलेला लाभ मिळत नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
- अविनाश मगर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT