सोलापूर : शहरातील शेळगी परिसरात शुक्रवारी (दि. ३१) पहाटे उमरग्याच्या दिशेने निघालेल्या बसने पुलावर उभ्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात एसटी चालकासह दोघांचा मृत्यू झाला. दहाजण जखमी आहेत.
कुरकुंभहून उमरग्याला बस (एम. एच. १४ एल. बी. ०३८०) निघाली होती. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. ट्रकमध्ये लोखंडी सळई असल्याने एसटी थेट सळईमध्ये घुसली. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. अपघातात एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, ता. तुळजापूर) आणि चालकाच्या बाजूला बसलेल्या प्रवासी नागुबाई राम रेवगे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
रामचंद्र प्रभाकर देवघे (वय ५७, रा. अणदूर, ता. तुळजापूर), विकास प्रकाश पाटील (३२, रा. आळंद, गुलबर्गा), माणिक नागप्पा वायचळ (५४, रा. तांदूळवाडी, ता. दक्षिण सोलापूर), रामलिंग ब्रह्मानंद कापसे (४०, रा. धाराशिव), अभिषेक दीपक चव्हाण (२५, रा. उमरगा, धाराशिव), अनिकेत सुभाष राठोड (३०, रा. सातारा), अभिजीत अरुण चव्हाण (४४, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर), नागोराव किस्तू तोडसांग (३७, रा. किणवर, परभणी), अनुराधा अर्जुन चव्हाण (६० रा. तुळजापूर, धाराशिव), तुलसीदास मनोहर पाचंगे (४९ रा. गुंजोटी,ता. उमरगा).