सोलापूर : मोहोळ ते सोलापूर या मार्गावरून आज रविवार रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास सोलापूरकडे जात असताना चारचाकी टेम्पोने समोरून जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेत टेम्पोमधील 14 जण जखमी झालेे आहेत. या अपघातातील सर्व जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व जखमी हे कर्नाटकातील आहेत. या अपघातात तीन लहान मुलांसह सहा महिलाही जखमी झालेले आहेत.
कर्नाटकातील काही जणांना घेऊन मोहोळवरून सोलापूरकडे निघालेल्या चारचाकी टेंपोने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात टेंपोतील 14 जण जखमी हे कर्नाटकातील बागेपल्ली कर्नाटकातील राहिवाशी आहेत.
मधु नारायण स्वामी (वय 32) रा. बागेपल्ली चिकबलपुरा, आदिया रेड्डी (5), प्रदीप आर. (22), गगनश्री ए. (20), रूपा नागभुषण (35), मुरली मोहन (44), लावण्या मधू (26), वेणुगोपाल लक्ष्मण रेड्डी (48), रंजिता रेड्डी (38), रोजी व्ही. (29), भौतिक रेड्डी (10), शोभा (45) रत्नम्मा (62), होशमित्ता (8) आदी जखमी झाले.