सोलापूर : कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहे. याचा फायदा दोन राज्याच्या चार जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना झाला आहे. शिवाय या विशेष गाडीमुळे महालक्ष्मीसह गाणगापूरला दर्शनासाठी भाविकांना सहज जाता येणार आहे.
गाडी क्रमांक 01451 ही विशेष गाडी कोल्हापूर-कलबुर्गी या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी कोल्हापूरच्या स्थानकांवरून सकाळी 06.10 वाजता सुटेल. सदर गाडी हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अरेग, बेकांकी, सालाग्रे, कवठे महांकाल, लांगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळे, वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड यामार्गे कलबुर्गीला जाणार आहे. तसेच सर्वच ठिकाणी या विशेष गाडीला थांबा देण्यात आला आहे. परिणामी कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह कलबुर्गी आदी शहर जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.