पिलीव : बचेरी (ता. माळशिरस) येथील शेतकरी दीपक श्रीमंत गोरड यांच्या गट नंबर 246 या दीड एकर क्षेत्रामध्ये शेतीला दिवसा पाणी देता यावे. म्हणून विहिरीवर बसवलेला सोलरपंपच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने काढून नेल्या आहेत. यामुळे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याने सोलरच्या 90 हजार रुपये किंमतीच्या 9 प्लेटा चोरून नेल्याने नुकसान झाले आहे. अशा चोरट्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.