शिक्षक pudhari
सोलापूर

Solapur News| शिक्षकांच्‍या आंतरजिल्‍हा बदलीचा मार्ग मोकळा

शिक्षक सहकार संघटनेच्या आंदोलनाला यश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : केंद्र सरकारने शिक्षकांच्‍या आंतरजिल्‍हा बदल्‍या करण्याचे स्‍पष्ट निर्देश दिल्याने शिक्षकांच्‍या आंतरजिल्‍हा बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा राबविण्यासाठी अनेक वर्षापासून प्रतीक्षेत शिक्षकांसाठी शिक्षक सहकार संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. याला अखेर यश आले. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला आंतरजिल्हा बदली संदर्भात कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ११ ऑगस्टला आझाद मैदानात महिला शिक्षकांनी कुटुंबीयांसह मुंडन आंदोलन केले होते. त्यावेळी ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री, शिष्टमंडळाने भेट घेतली होती. दोन्ही मंत्र्यांनी केंद्र शासनाने बदल्या न करण्याबाबत महाराष्ट्र शासनाला निर्देश दिल्याचे सांगितले होते.

शिक्षक सहकार संघटनेच्या विनंतीमुळे त्यांनी बदलीचा टप्पा राबवण्याबाबत मार्गदर्शन मागविण्याचे आश्वासन दिले होते. संघटनेने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालयाकडे हजारो ई-मेल पाठवले. तसेच गृह विभागाचे सचिवांची दोनवेळा प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. त्याची दखल घेऊन केंद्राने बदल्‍याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT