सोलापूर

Solapur: अध्यक्ष एसटीने अन्‌‍ उपाध्यक्ष सायकलवर येणार झेडपीत

पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद; दर सोमवारी होणार प्रवास

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर त्यास सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यापुढे दर सोमवारी अध्यक्ष दीपक वैद्य हे बार्शी येथून एस. टी. बसने तर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे सोलापूर शहरातून सायकलवर जिल्हा परिषदेत येणार आहेत.

तसेच जिल्हा परिषदेत दर सोमवारी इंधन बचत दिन पाळला जाणार आहे. अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी शक्यतो सायकल, सार्वजनिक वाहतूक सेवा किंवा सामायिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांनी केले.

इंधन बचत उपक्रमांतर्गत स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्य हे दर सोमवारी एसटी बसने प्रवास करून किंवा रविवारी यशवंतनगर येथील रेस्ट हाऊस येथे मुक्काम करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

देशात वाढते इंधन दर, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण या पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली आहे. याच विचारातून जिल्हा परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात सहभाग घेतला पाहिजे. छोट्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो, असे अध्यक्ष वैद्य यांनी स्पष्ट केले.

दर सोमवारी सायकल, सार्वजनिक वाहतूक आणि शेअर कारचा अवलंब केल्यास इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल. पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल. जिल्हा परिषदेतून सुरू झालेला हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायी ठरेल. अशा प्रकारचा निर्णय घेणारी सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच आहे.
- इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT