Solapur ZP  Pudhari
सोलापूर

Solapur ZP: झेडपी अध्यक्षांचे नाव शेवटपर्यंत सस्पेन्स

पालकमंत्र्यांनी निवडीच्या दिवशी जाहीर केले नाव : सदस्यही होते अनभिज्ञ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता जिल्ह्यासह भाजपच्या सदस्यांना लागली होती. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांची नावे शेवटपर्यंत गुपित ठेवली. तसेच निवडीच्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता अध्यक्ष म्हणून बार्शीचे दीपक वैद्य तर उपाध्यक्ष म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील इंद्रजित पवार यांचे नाव बैठक घेऊन जाहीर केले. लगेच दोघांना अर्ज भरण्यासाठी पाठविले.

वैद्य, पवार यांनी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अर्ज दाखल केले. तेव्हापर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष होणार आहेत, याची कल्पना नसल्याची माहिती अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार असल्याने भाजपच्या 38 सदस्यांना बालाजी सरोवर येथे सकाळी 10 वाजता बोलाविले. काही सदस्य सकाळी नऊलाच येऊन थांबले तर काही सदस्यांनी अकरा वाजता हजेरी लावल्याचे चित्र पहायला मिळाले.

आजी-माजी आमदारांच्या बैठकीत झाला निर्णय

बालाजी सरोवर येथे बुधवारी (18) अकरा वाजता आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. प्रशांत परिचारक, राजन पाटील, राजेंद्र राऊत, राम सातपुते, रणजितसिंह शिंदे यांची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीविषयी चर्चा केली. त्यानंतर सदस्यांच्या बैठकीत येऊन अध्यक्ष, उपाध्यक्षांची नावे जाहीर केली. तोपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार, याची माहिती नव्हती, असे काही भाजपच्या सदस्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT