सोलापूर : अर्थसंकल्पाची सुटकेस सीईओ कुलदीप जंगम यांच्याकडे देताना मीनाक्षी वाकडे. Pudhari Photo
सोलापूर

सोलापूर : झेडपीचा 45 कोटींचा अर्थसंकल्प

सीईओ कुलदीप जंगम : प्रत्येक विभागांसाठी विविध नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे सन 2025-26 चे 45 कोटींचे शिलकी अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बुधवारी (दि. 19) यशवंतराव चव्हाण सभागृहात मांडले. यावेळी अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, डेप्युटी सीईओ स्मिता पाटील, वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे उपस्थित होते. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या विभागांसाठी नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश केला आहे.

अंदाजपत्रकात सीईओ जंगम यांनी सार्वजनिक आरोग्य व कृषी विभागासाठी नावीन्यपूर्ण योजना मांडल्या. आशा वर्कर, गर्भवती महिलांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी 40 लाखांची तरतूद केली आहे. तर कृषी विभागात महिला शेतकर्‍यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यासाठी महिला किसान शक्ती पंख योजना’ जाहीर केली आहे. त्यासाठी 50 लाखांची तरतूद केली आहे. अंदाजपत्रकास सभेने एकमताने मंजुरी दिली. शेवटी सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आभार मानले.

समाजकल्याण विभाग

- तरतूद - चार कोटी 61 लाख

- मागासवर्गीयांना शेळीपालन गट, गाई, म्हैस खरेदीसाठी अनुदान

- विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद

- व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षण निधी

- दिव्यांगास ई-रिक्षा, ई-बाईकसाठी निधी

कृषी विभाग

तरतूद : तीन कोटी 86 लाख

- महिला शेतकर्‍यांना देणार ड्रोनद्वारे फवारणी यंत्र

- ट्रॅक्टर चलित औजारांसाठी विशेष निधी

- सिंचनासाठी पेट्रोकेरोसिन, ऑईल इंजिन, पाच व सात एच.पी विद्युत मोटार

बांधकाम विभाग

तरतूद - नऊ कोटी

- प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी व्यापारी गाळे बांधणे.

- जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे बांधकाम, विस्तारीकरण व दुरुस्ती

आरोग्य विभाग

तरतूद - पाच कोटी 10 लाख

- गर्भवती महिलांच्या किटसाठी 40 लाख

- औषधे खरेदीसाठी एक कोटी

शिक्षण विभाग

तरतूद - पाच कोटी 20

- जि. प. शाळांमध्ये क्रीडा साहित्यासाठी निधी

- विज्ञान प्रदर्शन, क्षेत्रभेटीसाठी निधी

- शाळा दुरुस्तीसाठी दोन कोटी 40 लाख

महिला व बालकल्याण

तरतूद - तीन कोटी 29 लाख

पशुसंवर्धन विभाग

तरतूद - तीन कोटी 20 लाख

ग्रामपंचायत विभाग

तरतूद - 10 कोटी तीन लाख

ग्रामीण पाणीपुरवठा

तरतूद - दोन कोटी 96 लाख

अंदाजपत्रक तयार करत असताना सर्व विभाग प्रमुखांंनी केलेल्या सूचना व शिफारशींचा विचार करुन ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून बजेट सादर केले आहे. यामध्ये महिला, शेतकरी, आशा वर्कर, विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश केला आहे.
-कुलदीप जंगम, सीईओ, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT