Jaykumar Gore File Photo
सोलापूर

Solapur ZP Elections: झेडपीवर सत्तेसाठी भाजपची रणनिती

पालकमंत्री जयकुमार गोरेंनी काढला जिल्हा पिंजून

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : नगरपालिका, महापालिकेनंतर झेडपीवर भाजपची एकहाती सत्ता येण्यासाठी भाजपने रणनिती आखली. त्याची सर्व धुरा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर पश्रक्षेष्ठींनी दिली. त्यामुळे जिल्हा पिंजून काढत पालकमंत्री गोरेंनी दिवसाकाठी दहा ते बारा सभा घेतल्या. विकासाच्या दृष्टीने केंद्रात, राज्यात त्यानंतर आता झेडपीतही भाजपाची सत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी प्रचारात पटवून सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सभा घेतल्या. दरम्यान, सोलापूर महापालिकेवर भाजपने पालकमंत्री गोरेंच्या नेतृत्त्वाखाली दणदणीत बहुतम मिळवले. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांच्या बिनविरोध निवडी झाल्या. विकासाचा एकमेव मुद्दा पुढे करीत महापालिकेत पालकमंत्र्यांनी भाजपाची सत्ता आणली. आता गट, गणांच्या निवडणुकीतही पालकमंत्र्यांची महापालिका निवडणुकी-प्रमाणेच रणनिती असल्याने या ही निवडणुकीत दणदणीत यश मिळेल अशी सद्यस्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT