सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेसाठी 85 कोटी 70 लाख, पंचायत समितीसाठी 85 कोटी 70 लाख असा 171 कोटी 40 लाखांचा निधी उपलब्ध झाला.
जिल्हा परिषदेवर चार वर्षे प्रशासकराज होते. त्यामुळे शासनाने सदस्यांसाठीचा पंधराव्या वित्त आयोगातील विकास निधी दिला नव्हता; मात्र आता जि. प., पं. समितीच्या सदस्यांना विकासकामांसाठी 15 व्या वित्त आयोगातील ग्रामविकास विभागाकडे थकलेला निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे.
विशेष तपशील...
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांकडील बंधित व अबंधित कामांसाठी हा निधी खर्च करता येणार जिल्हा परिषदेच्या तिजोरीत इतका मोठा निधी चार वर्षांनंतर पहिल्यांदाच उपलब्ध यापूर्वी पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींसाठी 29 कोटी निधी दिला होता.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पंधराव्या वित्त आयोगाचा 170 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यातील 85 कोटी जिल्हा परिषद, तर 85 कोटी रुपयांचा निधी पंचायत समित्यांना देण्यात येणार आहे.- कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर