Solapur ZP Pudhari
सोलापूर

Solapur ZP : झेडपीत दहा, पं. समितीत पाच सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य

स्वीकृत सदस्य निवडीचा मार्ग मोकळा; इच्छुकांची मोर्चेबांधणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. नवीन नियमांनुसार जिल्हा परिषदेच्या दहा तर पंचायत समितीच्या पाच सदस्‍यांच्‍या मागे एक स्‍वीकृत सदस्‍यांची निवड करण्यात येणार आहे. याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दुजोरा दिला.

दरम्यान, यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत सात तर पंचायत समितीत २७ स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी संबंधित उमेदवार जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच अनुभवी व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना स्‍वीकृत सदस्‍य म्‍हणून संधी मिळू शकते.

जिल्‍हा परिषद आणि पंचायत समितीत स्‍वीकृत सदस्‍य निवडीविषयी ग्रामविकास विभागाने आदेश काढला आहे. जिल्‍हा परिषदेत दहा तर पंचायत समितीत पाच सदस्‍यांमागे एकाची स्‍वीकृत सदस्‍य म्‍हणून निवड करण्यात येईल.
- जयकुमार गोरे, ग्रामविकास तथा पालकमंत्री

झेडपीतील पक्षीय बलाबल

भाजप - ३८, राष्ट्रवादी अजित पवार गट - १०,

शिंदे शिवसेना - ८, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट - ६,

शेकाप - ३, करमाळा विकास आघाडी - २, पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडी - १

कोणत्‍या पक्षाला किती स्वीकृत सदस्‍य लाभणार

भाजपा - ४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) -१

शिंदे शिवेसना - १, इतर सर्व पक्ष मिळून - १

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT