सोलापूर ःजिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. याचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले जात आहे. योग्य नियोजन, सर्वांची बांधलेली मोट, शतप्रतिशत भाजपाचा नारा यामुळे हे शक्य झाले. यापुढील काळात पालकमंत्री बोले आणि जिल्हा हाले अशी परिस्थिती होणार असल्याचे दिसते. याचा फायदा आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची ही निवडणूक गोरे यांना तशी सोपी नव्हती. दोन खासदार तसेच 11 पैकी सहा आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत. तेथील भाजपाच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांनी ताकद दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे भाजपाचे कोणताहे वरिष्ठ नेते प्रचारासाठी आले नाहीत त्यामुळे पालकमंत्र्यांनी निवडणुकीत एकहाती किल्ला लढवला. दररोज दहा ते बारा सभा घेत प्रचाराचा धुराळा उडवला.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणत विरोधकांचा आवाज क्षीण करुन टाकला. केंद्रात आणि राज्यात असलेली भाजपाची सत्ता याचा फायदा विविध विकासकामांसाठी होणार आहे हे पटवून दिले. विकास करायचा असेल तर झेडपीवर भाजपाची सत्ता महत्चाची असल्याचे सांगत विकासाच्या मुद्यावर विरोधकांना घेरले. विरोधकांचीही एकजूट नसल्याने त्याचा फायदा पालकमंत्र्यांनी उचलत भाजपाला बळ कसे मिळेल याचे नियोजन केले. सोमवारी आलेल्या निकालावरून गोरे यांचा दबदबा वाढल्याचे दिसते.
झेडपी, आठ पंचायत समिती ताब्यात
नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सर्वात जास्त 131 नगरसेवक जिल्ह्यात निवडून आले. चार नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष झाला
त्यानंतर महापालिका निवडणुकीत पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सोलापूर महापालिकेच्या 102 पैकी तब्बल 87 नगरसेवक निवडून आले
या दोन्ही दणदणीत विजयानंतर पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेत 68 पैकी 38 सदस्य निवडून आले. 11 पैकी तब्बल आठ पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात आल्या.
जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झेडपीत भाजपाचा अध्यक्ष होणार