Solapur ZP Election: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक सक्रिय Pudhari Photo
सोलापूर

Solapur ZP Election: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक सक्रिय

मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महानगर पालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 26 प्रभाग आणि 102 नगरसेवक संख्या आहे. 2017 ची जैसे थे प्रभाग रचना असल्याने नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या ही प्रभाग रचना नागरिकांना पाहाण्यासाठी महानगरपालिकेत लावण्यात आली आहे. 15 सप्टेंबर पर्यंत सुुचना हरकतीसाठी मुदत आहे. शेवटचे तीन दिवस शिल्लक आहे. आता पर्यंत पाच हरकती दाखल आहेत. यात एकही हरकत दखलपात्र नाही.

एकाही राजकीय पक्षाने अथवा माजी नगरसेवकांनी या प्रारूप आराखड्यास आक्षेप घेतला नाही. त्यामुुळे सर्व काही आलबेल असल्याने सध्याचे चित्र आहे. त्यामुुळे सर्व आजी माजी नगरसेवक आता पासून प्रभागावर लक्षकेंद्रीत करून कामाला लागले आहेत.

नवरात्र उत्सव काही दिवसांवर आला आहे. सर्वाजनिक मंडळांचा लेझिमचा सराव चालू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्काचे नवे धागे विणण्यास सुरुवात केली आहे. उत्सव काळात मंडळांशी संपर्क, सामाजिक उपक्रमात सहभाग, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन अशा माध्यमातून मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रभागात समाविष्ट झालेल्या भागांमध्ये मतदारांशी ओळख वाढवली जात आहे. नवरात्रातील दांडिया-गरबा, देवीची आरास व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय राहून आपली उपस्थिती दाखवण्यावर भर देताना दिसून येत आहे. नवरात्र उत्सव हा इच्छुकांसाठी मतदारांशी जोडून घेण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुुक नगरसेवक या संधीचे सोने करण्यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहेत.

प्रभाग रचनेनंतर इच्छुकांची धावपळ सुरू

महानगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना अखेर जाहीर झाली. त्यामुुळे स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक नगरसेवकांनी आत्तापासून तयारीला सुरुवात केली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक नगरसेवक सार्वजनिक कार्यात खूपच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT