सोलापूर

Solapur electricity news: अतिरिक्त भारामुळे वीजपुरवठा विस्कळीत

सुरळीत वीज पुरवठ्यासाठी झरेतील ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : झरे येथे आठवडाभरापासून थ्री फेज व सिंगल फेज वीज पुरवठा बंद असल्याने झरे परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी झरे सबस्टेशनवर एकत्र येत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विस्कळीत वीज पुरवठ्याबाबत जाब विचारला.

गतवर्षीही उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरणाच्या झरे सब स्टेशनवर इतर ट्रान्सफॉर्मर जोडल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर झरे परिसरातील शेतकऱ्यांनी जळू लागलेल्या पिकांचा पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांना भेट देत अनोखे आंदोलन केले होते. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या सबस्टेशनवरील इतर अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर नियोजित सबस्टेशनला जोडल्यामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत होता.

मात्र यावर्षीही पुन्हा इतर ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरचा भार वाढल्यामुळे या शेतकऱ्यांची कृषी पंपांसह अधिकृतपणे असलेला घरगुती वीज पुरवठाही बंद आहे. याबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. जेमतेम पाण्याच्या भरवशावर झरे परिसरातील काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासह थोडक्या ठिकाणी केळी किंवा ऊस पिकाची लागवड केली आहे. मात्र ऐन पाणी देण्याच्या दिवसात वीजपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह या पिकांना जगण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही.

त्यामुळे सर्व बाधित शेतकरी झरे सबस्टेशन वर एकत्र आले. सबस्टेशनच्या ऑपरेटरने वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ग्रामस्थांनी महावितरणचे उपअभियंता आशिष कलावते आणि संबंधित अधिकारी मारुती झुंजकर यांच्याशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी सुट्टी असल्याचे सांगत सविस्तर चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT