सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे उजनी डावा कालवा येथे पोहताना पाण्यातील मोटारीचा करंट लागून तरुणाचा मृत्यू झाला. गौसपाक जावीद शेख (वय 22, रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दि.1 घडली. जखमी तरुणाला त्याच्या वडिलांनी पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.