प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाची बेदम मारहाण करून हत्या  
सोलापूर

Solapur Crime : प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाची बेदम मारहाण करून हत्या

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाला वायरने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अरविंद बाळू मस्के (वय २७, रा. तरटगाव, ता. उत्तर सोलापूर) याचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. तामलवाडी पोलिस ठाण्यात दोघांसह अन्य साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

अरविंदची आई रुक्मिणी बाळू मस्के (वय ४५, रा. तरटगाव) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी विशाल वडणे, ओंकार वडणे (दोघे रा. माळुंब्रा) आणि अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, अरविंदचे मागील तीन-चार महिन्यांपासून माळुंब्रा येथील अर्चना वडणे हिच्याशी प्रेमसंबंध होते. यावरून अर्चनाचा पती विशाल व मुलगा ओंकार यांनी अरविंदच्या कुटुंबीयांना धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. १५ ऑगस्ट रोजी अरविंदला माळुंब्राजवळ विशाल वडणे, ओंकार वडणे व त्यांच्या इतर साथीदारांनी वायरने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. जखमी अरविंदवर उपचार सुरू असताना २२ ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर नरसप्पा पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT