Women ended life 
सोलापूर

Solapur Crime : फोटो व्‍हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणीने जीवन संपवले

नांदणी येथील घटना; तरुण घालत होता लग्नाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे फोटो समाजमाध्यमांवर व्‍हायरल करतो, अशी धमकी दिल्याने घाबरून १८ वर्षांच्या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नांदणी येथे घडली. अमुल्या मल्‍लिकार्जुन भुरळे (वय १८, रा. नांदणी, ता. दक्षिण सोलापूर) असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

अमुल्या ही मंगळवारी (दि.१७) रात्री राहत्‍या घरी असताना संशयित आरोपी रतिकांत महादेव सुरवसे हा तिच्‍या घरी आला. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझे फोटो व्‍हायरल करतो, अशी धमकी त्‍याने दिली. दरम्‍यान, यामुळे घाबरलेल्या अमुल्‍या हिने रागाच्‍या भरात राहत्‍या घरी लोखंडी अँगलला दोरीच्‍या सहाय्याने गळफास घेतला.

नातेवाईकांनी गळफासातून उतरवून उपचारासाठी सोलापूरच्‍या शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वी ती मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्‍हिल पोलिस चौकीत झाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी रतिकांत सुरवसे याच्‍यावर मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT