Fraud Pudhari
सोलापूर

Solapur Fraud : कामगाराने केली मालकाची पावणेपाच लाखांची फसवणूक

बनावट बिल तयार करून स्‍वतः बँक खात्यात रक्कम जमा करत चार लाख ७२ हजार १५२ रुपयांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बांधकामासाठी लागणाऱ्या वाळू, खडी आणि क्रशर मटेरियल पुरवठ्याच्या व्यवसायात काम करताना बनावट बिल तयार करून स्‍वतः बँक खात्यात रक्कम जमा करत कामगाराने चार लाख ७२ हजार १५२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन अशोक जगदाळे (रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) यांचा वाळू, खडी, क्रशर मटेरियल पुरवण्याचा व्‍यवसाय आहे. त्‍यांच्‍याकडे संशयित आरोपी शिवम संजय बाकरे (रा. अंबिका नगर, बाळे, सोलापूर) हा कामास होता. व्‍यवसायातून आलेली रक्‍कम बँकेत भरण्यासाठी ते बाकरे याच्‍याकडे देत होते. त्‍याने या बिलांवर स्‍वतःचे नाव टाकून सदर रक्‍कम स्‍वतःच्‍या खात्‍यावर भरली.

याप्रकरणी शिवम बाकरे याच्‍यावर जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT