Solapur temperature pudhari photo
सोलापूर

Solapur temperature: तापमानात सातत्याने वाढ, उष्णतेची धग कायम

पाऊस काही पडेना, सोलापूरकर वाढत्या उकाड्याने त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : तापमानात सातत्याने पुन्हा वाढ होत असून, मे महिन्याचा पंधरावडा उलटला तरी अद्याप मोठा अवकाळी पाऊस न पडल्याने उष्णतेची धग कायम आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. गुरुवारी दि. 14 मे रोजी 42.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

यंदाचा उन्हाळा कडक राहिला असून, तापमान 40 ते 44 अंशाजवळ राहिला आहे. उष्णतेच्या झळांमुळे उकाड्याने नागरिक घामेघुम झाले आहेत. एप्रिलच्या अखेरीतस तापमानात 44 अंशापर्यंत पोहचला होता. त्यानंतर पुन्हा तापमानात किंचित घट झाली होती. परंतू गेल्या चार दिवसांपासून तापमानात पुन्हा वाढ होत आहे. यंदा पावसाळ्यावर हवामान विभागाने अल निनोचा संकट असल्याचे सूचना दिल्या आहेत.

यंदा अधिक महिना हा जेष्ठ महिन्यांत आल्याने पावसाळ्याला फटका असण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हापासून संरक्षणासाठी मठ्ठा, ताक, लिंबू शरबत, फळांचे ज्यूस यासारख्या नैसर्गिक पेयांचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे. दिवसभर वातावरण ढगाळ आणि ऊन सावलीचा खेळ दिसत असला तरी त्याचा धग कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT