Water Tankers 
सोलापूर

Solapur Water Crisis| जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; १९८ गावांना २२९ टँकरने पुरवठा

नागरिक, पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाची धावपळ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून, टंचाई निवारणार्थ प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल १९८ गावे आणि ९५७ वाड्या-वस्त्यांवरील ३ लाख ९९ हजार ९३५ नागरिकांना व १ लाख ९५ हजार २९७ पशुधनाला सध्या २२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या खेपांसोबतच ५० विहिरी आणि ३२ बोअरवेल असे एकूण ८२ खासगी जलस्रोतही प्रशासनाने अधिग्रहित केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड यांनी दिली.

जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावांसाठी सर्वाधिक ५८ टँकर सुरू आहेत, तर त्याखालोखाल सांगोला तालुक्यातील ३९ गावांसाठी ५५ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. टंचाईग्रस्त भागातील नागरिक आणि जनावरांची गैरसोय होऊ नये, यासाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुकानिहाय टँकर व गावांची आकडेवारी :

l मंगळवेढा : ४५ गावे – ५८ टँकर

l सांगोला : ३९ गावे – ५५ टँकर

l अक्कलकोट : २७ गावे – १७ टँकर

l माढा : १६ गावे – २२ टँकर

l बार्शी : १७ गावे – ७ टँकर

l करमाळा : १६ गावे – १५ टँकर

l माळशिरस : ११ गावे – ११ टँकर

l मोहोळ : १० गावे – १७ टँकर

l उत्तर सोलापूर : ९ गावे – १६ टँकर

l दक्षिण सोलापूर : ७ गावे – १० टँकर

l पंढरपूर : १ गाव – १ टँकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT