Water crisis 
सोलापूर

Solapur Water Crisis : चार महिन्यांपासून पाण्यासाठी हाल सुरूच

रेणुका नगरीत पाणी विकत घ्यावे लागते

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात जुळे सोलापुरातील रेणुका नगरात पाण्याची टंचाई जाणवत आहे. पाणी टँकरद्वारे विकत घेण्याची वेळ आली आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

जुळे सोलापुरातील रेणुका नगरीत सहाशे घरांची वसाहत आहे. येथे गेल्या चार महिन्यांपासून पालिकेकडून पाणीपुरवठा नियमित नाही, कमी दाबाने पाणी येते, अशा तक्रारी आहेत. याबाबत चौकशी केल्यास अधिकाऱ्यांकडून सरकारी ढंगात या नागरिकांना उत्तरे मिळतात. ऐन उन्हाळ्यात पाण्यासारख्या गंभीर समस्येने येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. सध्या खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लक्ष देऊन सुरळीत पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे.

आठ दिवसाने तेही कमी दाबाने पाणी येते. धड साठवणूकसुद्धा करता येत नाही. म्हणून यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. नियमित पाणी येत नसल्याने खासगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ या कुटुंबीयांवर येत आहे.

येथील पाण्याची समस्या ही गेल्या चार महिन्यांपासून असून याविषयी पाणीपुरवठ्याचे अधिकारी व झोन अधिकारी यांच्यासह अनेकांच्या कानापर्यंत पाणी समस्या गंभीर असल्याची गोष्ट पोहोचली. मात्र, या सर्वच यंत्रणेकडून येथील पाणी समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न अद्यापपर्यंत झाले नसल्याने आम्ही गेल्या चार महिन्यांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथानपणाचा फटका सहन करतोय.
-प्रशांत शिरगुर, सामाजिक कार्यकर्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT