voter list File Photo
सोलापूर

Solapur News : सोलापुरात ३.१५ लाख मतदारांना नोटीस

विशेष पुनरीक्षण कार्यक्रम; २००२ च्या जोडणीची पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून, मतदार यादीशी मॅपिंगद्वारे नाते व वय असे प्रत्येक नावाची २००२ च्या जुन्या जोडणीची पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यातील ३३ लाख १८ हजार ४२४ प्रारूप मतदारांपैकी नावात, जन्मतारखेत अथवा त्यात तफावत आढळलेल्या ३ लाख १५ हजार मतदारांना निवडणूक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

मतदार यादीत नाते संबंधात तपासणी करताना आई-वडील आणि मुलांच्या वयात १५ वर्षांपेक्षा कमी अंतर दिसत आहे. एकाच मतदाराची नावे ही दोन वेगवेगळ्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेल्या मतदारांनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड अन्य वैध पुरावा जोडून म्हणणे सादर करावे लागणार आहे. चुकीच्या दुरुस्तीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून त्यात नावे नोंदवता येणार आहे.

अंतिम मतदार यादी ही १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. १७ जून रोजी प्रसिद्ध मतदार यादीत सोलापूर जिल्ह्यात ३९ लाख ४१ हजार ९५ इतके मतदार होते. त्यानंतर विशेष सखोल पूररीक्षणनंतर ३१ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात ३३ लाख १८ हजार ४२८ मतदार होते. ६ लाख २२ हजार ६७१ मतदार वगळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT