सोलापूर

Solapur Politics: दोन दिवसात 18 जणांनी नेले अर्ज

विधानपरिषद निवडणूक : अर्जदारांची नावे देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : विधानपरिदेच्या निवडणुकीसाठी दोन दिवसात इच्छूक 18 जणांनी अर्ज नेले आहेत. मात्र, हे अर्ज कोण घेऊन गेले, याविषयी नावे देण्यास जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.

मंगळवारी (दि.26) चार अर्जांची विक्री झाली. त्यात काँग्रेसच्या एका इच्छुकाने दोन अर्ज तर अपक्ष म्हणून दोन इच्छुकांनी प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 अर्ज खरेदी केले. मंगळवारी काँग्रेसच्या एका व्यक्तीने दोन अर्ज घेतले. एकच उमेदवार दोन अर्ज घेण्याची शक्यता असल्याने पक्षांतर्गत चुरस किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून अर्ज घेतल्याची चर्चा आहे. तर अपक्ष दोन व्यक्तींनी प्रत्येकी एक अर्ज घेतला.

निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून इच्छुकांचा प्रतिसाद वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT