File Photo
सोलापूर

Solapur Vande Bharat train: सोलापूरकरांचा ‌‘वंदे भारत‌’ने मुंबई, बंगळुरूचा प्रवास होणार

मुंबईला सहा तर बंगळुरूला 10 तासांत पोहोचा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सिध्देश्वर नगरीतील प्रवाशांच्या प्रवासाला गती मिळाली असून मुंबई व बंगळुरू यामार्गावरून स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ही वंदे भारत सोलापूरच्या सिध्देश्वर नगरीवरून जाईल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या गाडीला नुकतीच मंजुरी दिली. यामुळे, सोलापूरच्या प्रवाशांना बंगळुरूला फक्त दहा तासांत, तर माया नगरी मुंबईला 6 तासांत पोहोचता येणार आहे.

येथील प्रवाशांना बंगळुरूला उद्यान एक्सप्रेसनेच जावे लागत. यासाठी 13 तास 45 मिनिटे लागतात. कोईम्बतूरने जायचे म्हटल्यास 15 तास 45 मिनिटे लागतात. नव्याने सुरू होणाऱ्या स्लीपर वंदे भारतमुळे हा प्रवास जवळपास चार तासांनी कमी होईल. येथून जाणारी ही वंदे भारत स्लीपर ही देशातील दुसरी व राज्यातील पहिली गाडी आहे.

याचा मार्ग रेल्वे मंत्रालयाने अद्याप जाहीर केला नाही. पुणे-सोलापूर-वाडी मार्गे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावेल. दौंड-वाडी, वाडी व गुंटकल येथे रेल्वेमार्गावरून ताशी 130 किमीने धावू शकते. म्हणून, या मार्गावर वंदे भारत स्लीपरला गतीचा फायदा होणार आहे.

आठवड्यातून 6 दिवस वंदे भारत धावेल.

एक दिवस देखभालीसाठी ती बंद राहील.

मुंबई व बेंगळुरूहून रात्री 9 ला सुटेल.

या स्लीपर वंदे भारतचा प्रवास 16 तासाचा असणार.

सोलापूर-बंगळुरू अंतर कापण्यास लागणार दहा तासांचा वेळ.

कोचची क्षमता

एसी थ्री टियर : 11 कोच 611 आसन, एसी टू टियर : 4 कोच 188 आसन ,एसी फर्स्ट क्लास : 1 कोच 24 आसन, या गाडीची, प्रवाशी क्षमता ही 823 ची आहे.

मुंबई बंगळुरू ही स्लीपर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी जाहीर केला आहे. मात्र, या नव्या गाडीबाबत अद्यापही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. या विभागाचे कोटा किती व येथे किती वेळ ती थांबणार याविषयीची सविस्तर माहिती आली नाही.
जयदीप प्रदक्षणे,वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मध्य रेल्वे सोलापूर विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT