Solapur unseasonal rain Pudhari
सोलापूर

Solapur unseasonal rain: अवकाळीने बेदाण्याचा झाला चिखल

मुंगशी परिसरातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

पुढारी वृत्तसेवा

वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावात जोरदार वादळासह जोराचा अवकाळी पाऊस झाला. या अवकाळीने शेडवर टाकलेला बेदाणा खराब झाला.अनेकांचे घरावरील पत्रे उडून गेले.

मुंगशी येथील शेतकरी अर्जून श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी जालींदर राऊत यांच्या बेदाणा शेड वर आपला द्राक्षाचा माल टाकला होता. या अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट कागद उडून गेला व झालेल्या अती पावसाने अंदाजे 7 ते 8 टन बेदाण्याचा चिखल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे . वर्षभर पोटच्या लेकरांप्रमाणे संभाळलेली द्राक्ष बाग तसेच ती संभाळण्यासाठी महागडी औषधे, खते , मजूरी यावर झालेला अमाप खर्च करून हातातोंडाशी आलेला घास एका क्षणात नाहीसा झाला. यामुळे झालेल्या कर्जाचा डोंगर फेडायचा कसा व पुढील संकटांचा सामाना करायचा कसा हा मोठा प्रश्न आहे.

काही शेतकऱ्यांचे पिक अजून झाडावर आहे तरी काहींनी आपला माल शेडवर टाकला आहे . यामुळे झालेल्या या अस्मानी संकटाच्या नुकसानीतून बळीराजा सावरणार कसा हा मोठा प्रश्न आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे व बेदाणा शेडचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक शेतकांच्या बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने त्वरीत मदत करावी
- अजय क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मुंगशी
अफाट झालेला खर्च , वाढती महागाई यांच्या मुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे
- अर्जुन क्षीरसागर , नुकसानग्रस्त शेतकरी मुंगशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT