सोलापूर : जुळे सोलापुरातील वानकरनगर येथील पत्र्याच्या शेडमधील दुचाकी गोडाऊनला रविवारी सकाळी 11.15 वा. आग लागून सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. महापालिका अग्निशामक दलाने पाऊण तासात आग आटोक्यात आणत सुमारे दोन कोटी रुपयांच्या गाड्यांसह साहित्य आगीपासून वाचविले.
जुळे सोलापुरातील देविका गॅस एजन्सी जवळील दुचाकीच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच होटगी नाका जवळील अग्निशामक दल केंद्रातील जवानांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली.
अधीक्षक राकेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक अच्युतराव दुधाळ यांच्या माध्यमातून जवानांनी सहा गाड्यांद्वारे ही आग पाऊण तासाच्या कालावधीत आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या ठिकाणी दुचाकी गाड्यांना ॲक्सेसरीजचे साहित्य लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.