सोलापूर

Solapur News : परिवहन सेवेला ‘तारीख पे तारीख’

ई-बस व चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील सार्वजनिक परिवहन सेवा तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून विविध आंदोलने आणि निवेदने देण्यात आली होती. दोन वर्षे होऊन गेली तरी परिवहन सेवा सुरू झाली नाही, याच्या निषेधार्थ मरीआई चौकातील महानगरपालिका एक्झिबिशन हॉल येथे ‘तारीख पे तारीख’ आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

पालकमंत्री लोकप्रतिनिधी यांना महापौर यांनी सोलापुरात विजयाचा आनंद करताना शड्डू ठोकला होता, तो धागा पकडून पालकमंत्री आमदार महापौर यांनी सोलापूरच्या विकासासाठी शड्डू ठोकावा म्हणून पालकमंत्री यांची बंदुकी स्टाईलने खेळण्यातली बंदूक दाखवून तसेच आमदारांचा शड्डू ठोकून संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, गुंडप्पा जाधव, प्रकाश डोंगरे, शेखर भोसले, प्रकाश व्यवहारे, संतोष सुरवसे, राजेंद्र माने, सचिन यादव, अक्षय कांबळे, दिलीप निंबाळकर, प्रसाद देवरमनी, सिध्दाराम गुरव, महेश हिपळे, आदित्य हत्तुरे, बसवराज पाथरट, विनोद सुतार , सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT