सोलापूर : सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता सोलापूर-मुंबई विमानसेवा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा सोलापूरकरांना होती. मात्र येत्या 15 ऑगस्टपूर्वी मुंबईसाठी विमानेसवा सुरू होईल, अशी माहिती प्रशासनातील खात्रीशीर उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
गेल्या महिन्यात नऊ जून रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोलापूर ते गोवा विमानसेवेस प्रांरभ झाला झाला. महिनाभरात एक दिवस वगळता दररोज विमानसेवा सुरू असून, 1100 हून प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला. इंडी, विजयपूर, चडचण, तुळजापूर, सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांना या विमानसेवेचा फायदा झाला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईसाठीही लवकरच विमानसेवा सुरू होईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार मुंबईसाठी विमान सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
1 सोलापूर-मुंबईसाठी स्टार एअरलाईन ही कंपनी विमानसेवा सुरू करणार.
2 लवकरच करार पूर्ण होऊन 15 ऑगस्टच्याआधी विमानसेवा सुरू होईल.
3 सोलापूर मुंबईसाठी दुपारी दीड ते अडीच यावेळेत टेकऑफ तर लँडिंगसाठी चार ते सहा मिनिटांचा स्लॉट मिळण्याची शक्यता.