सोलापूर : उन्हाळी सुट्टीच्या काळात सोलापूर ते अनकपल्ले ही विशेष रेल्वे म्हणून धावणार आहे. या गाडीचा फायदा शहरासह जिल्ह्यातील दुधनी, अक्कलकोटसह अन्य गावातील प्रवाशांना फायदा होणार आहे. ही रेल्वे येत्या दहा जुलैपर्यंत धावणार आहे.
रेल्वे क्रमांक 01477 सोलापूर ते अनकपल्ले गाडी 17 एप्रिल ते 10 जुलैपर्यंत सोलापुरातून दर शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता सुटून ती अनकपल्लेच्या स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पोहोचेल. या गाडीच्या 13 फेऱ्या होतील. रेल्वे क्रमांक 01478 अनकपल्ले ते सोलापूर गाडी अनकपल्लेतून 18 एप्रिल ते 11 जुलै या कालावधीत दर शनिवारी दुपारी 5.35 वाजता सुटणार आहे. ती सोलापूरच्या स्थानकावर दुसऱ्या दिवशी रात्री 11.50 वाजता पोहोचेल. या गाडीच्या 13 फेऱ्या होणार आहेत.
या गाडीला अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड, कलबुर्गी, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम, कादिरी, मदनपल्ले रोड, पिलेर, पकाला, तिरुपती, रेनिगुंटा, श्री कलाहस्ती, नेल्लूर, ओंगोल, चिराला, तेनाली, विजयवाडा, एलुरू, ताडेपल्लिगूडेम, निदादावोलू, राजमुंद्री, समलकोट, अन्नावरम आणि एलामांचिली आदी ठिकाणी थांबे मिळणार आहेत.