Accident Pudhari
सोलापूर

Solapur Accident : टिप्परच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू

जुना पुना नाका येथे रविवार दुपारची घटना

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : टिप्परच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी शहरातील जुना पुना नाका येथे घडली. अंजना गणेश चव्हाण (वय ४०) आणि वैशाली धनाजी चव्हाण (वय ३८) (दोघे रा. चुंगी, ता. अक्कलकोट) अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.

गणेश दाजी चव्हाण (वय ४५) यांच्यासोबत या दोन्ही महिला ट्रिपल सीट बाळे येथून चुंगीकडे निघाल्या होत्या. जुना पुना नाका येथील ब्रीजवर आल्यावर टिप्परची दुचाकीला धडक लागली. अपघात होताना पाहून दुचाकीवरील दोन्ही महिलांनी खाली उडी मारली. दुर्दैवाने त्या टिप्परच्या चाकाखाली सापडल्या. या अपघातात दोघींचा जागेवरच मृत्यू झाला तर गणेश चव्हाण हे जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच शहर फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT