सोलापूर

सोलापूर : चारचाकी-दुचाकी गाडीच्या अपघातात तिघे ठार

Shambhuraj Pachindre

सांगोला; पुढारी वृत्तसेवा : सांगोला-पंढरपूर रोडवर मांजरी-बामणी गावाजवळ मोटरसायकलला चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिघेजण जागीच ठार झाले आहेत. ही घटना आज (दि.2) नऊच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की. आज (दि.2) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवर बामणी-मांजरी ओढयाच्या पुलाजवळ चार चाकी वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील धिरू कोळेकर, माळाप्पा धनगर, विठ्ठल दिवटे (रा. निपाणी ता. चिकोडी जि. बेळगाव कर्नाटक ) हे जागीच ठार झाले. रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT