सोलापूर : उष्णतेच्या झळाने अंगातून घामाच्या धारा निघत असतानाच पुन्हा गुरुवारी 21 मे रोजी तापमानात वाढ झाली. 40.9 अंश सेल्सिअस इतका कमाल तापमानाची नोंद झाली. बुधवारी तापमानात काही घट होऊन 38.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. मे महिना संपत आला तरी अद्याप उष्णतेच्या झळा वाहत आहेत.
मागील वर्षी 10 मे पासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. मे अखेरीस सर्वत्र हिरवाई पसरली होती. यंदा मात्र एप्रिल आणि मे महिना हा सर्वाधिक हॉट ठरला असून, मागील दोन महिन्यांत तीन दिवसांचा अपवाद वगळता दररोज तापमानाचा पारा हा 40 अंशावर राहिला आहे.
22 मेपासून रोहिणी नक्षत्राच्या पावसाला प्रारंभ होत आहे. या नक्षत्रातील ज्या भागात चांगला पाऊस पडतो, तसाच पाऊस उर्वरित नक्षत्रातील पाऊस पडतो, असा शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या पावसाकडे चातकासारखा लक्ष लावून बसले आहेत.